Waving PandaStart listening
Back
जुपीटरची गोष्ट

जुपीटरची गोष्ट

Story by - Arnav Date

(VED Acting Institute)

rocket image
Bulb imageBulb imageBulb imageBulb imageBulb imageBulb image

महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात रोनाक नावाचं एक छोटास गाव होत. त्या गावात अर्णव नावाचा एक मुलगा राहतं होता. तो अभिनव महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याला भूगोल हा विषय खूप आवडायचा. तो बाईंना भूगोलाचे वेगवेगळे प्रश्न विचारायचा. अंतराळातील विविध गोष्टींचा अभ्यास करायचा आणि एक दिवस अंतराळाला गवसणी घालायची हे त्याच स्वप्न होत.

आपल्या घरच्या कमाईतून हे शक्य नाही हे अर्णव समजून होता. मग अवकाशातील ग्रह तारे बघायला एखादा जादूचा चष्मा मिळावा अशी तो कल्पना करत असे, कल्पनेला सत्याची जोड मिळावी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत म्हणून त्याने बाबांकडून चष्मा बनवून घेतला पण तो जादूचा कसा होणार??? हा प्रश्न काही केल्या सुचत नव्हता. अर्णवने नवनवीन जादू शिकवणारी पुस्तके वाचली, मित्रांसोबत चर्चा केली, आई-बाबा, भूगोलाचे शिक्षक, सगळ्यांना विचारला पण सगळ्यांनी ‘असा काही जादूचा चष्मा नसतो’, असच सांगितलं. पण अजूनही त्याने अशा सोडली नव्हती. अभ्यासासोबत त्याने हि शोधमोहीमसुद्धा सुरू ठेवली आणि एकदिवस त्याला जादूच्या प्रयोगाचे काही पास मिळाले., ही संधी त्याने अचूक हेरली प्रयोग संपताच अर्णव त्या जादूगाराना विंगेत जाऊन भेटला आणि तू मला तो चष्मा जादूचा करूनच द्या असा त्याने हट्टच धरला. त्या जादूगार काकांनी अर्णवला समजावलं कि प्रत्येकाची जादू वेगळी असते. मी तुला चष्मा तर जादूचा नाही बनवून देऊ शकणार, पण तुला तो बनावता यावा यासाठी मी तुला एक मंत्र देऊ शकतो, तो कसा वापरायचा हे तुझं तुला शोधावं लागेल. अर्णवने लागलीच होकार दिला आणि त्या जादूगर काकांकडून तो मंत्र समजावून घेतला आणि मनापासून पाठ केला.

आता मंत्र तर मिळाला तो वापरून बघावा यासाठी तो घरी जाऊन लगबगीने खोलीत शिरला आणि खोलीचं दार बंद करून त्याने तो मंत्र म्हटला.

‘आब्रा का डेब्रा गीली गीली चू, जादूच्या चष्मा हो रे तू!’

 पण त्या मंत्राने काही फरकच पडला नाही, नंतर अर्णवने चष्मा कॉव्हरमधून बाहेर काढला न परत एकदा तो मंत्र म्हणला.

‘आब्रा का डेब्रा गीली गीली चू, जादूचा चष्मा हो रे तू!’

तेव्हा तो चष्मा हवेत उडाला आणि जमिनीवर पडला. अर्णवला थोडी आशा वाटू लागली, त्याने चष्मा डोळ्याला लावला पण त्याला काहीच फरक जाणवला नाही. परत चष्मा काढून निरखून पाहिला पण काय करावे त्याला सुचेना, वैतागून चष्मा घालून तो खोलीत सैरभैर फिरू लागला. काहीच बदल जाणवत नव्हता. शेवटी दमून आपल्या बेडवर बसला आणि समोरच्या आरशात स्वतःला पाहू लागला तेव्हा त्याला आपल्या चष्म्यावर एक छोटे बटन असल्याचे दिसले या बटणात काहीतरी दडले आहेत हे त्याला समजले त्यांनी बटन दाबून पाहिले पण काहीच झाले नाही. मग निरखून पाहिल्यावर त्या बटनाच्या कडेने उभ्या रेषा असल्याचे त्याला दिसले. तेव्हा त्याने ते बटन उजव्या दिशेने फिरवले समोरच्या आरशातली त्याची प्रतिमा त्याला मोठी झाल्याची समजले विरुद्ध दिशेने बटन फिरवता आपली प्रतिमा लहान होत आहे हेही त्याला जाणवले आता त्याला मंत्राने केलेल्या जादूची थोडी थोडी समज यायला लागली लागलीच तो चष्मा घेऊन टेरेसवर गेला आणि ध्रुवतारा त्या चष्मातून पाहिला त्या तार्‍याचे तेज पाहून त्याला ध्रुव बाळाची आठवण झाली.

त्या रात्री त्याने आकाशातील सप्तर्षी आणि अनेक लहान मोठे ग्रह तारे त्या चष्म्यातून पाहिले. तेव्हा त्याच्या मदतीने आपण एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागापर्यंत अंतर पाहू शकतो हे त्याला जाणवले. विविध ग्रहांची पाहणी करत चष्म्याच्या मदतीने लहान मोठी निरीक्षणे नोंदवायला सुरुवात केली. त्यासोबतच तो विविध ग्रहांची माहिती सुद्धा इंटरनेटवरून शोधू लागला. त्यातून उद्भवणाऱ्या शंका शिक्षकांना विचारू लागला, त्याची ही तळमळ पाहून त्याच्या आई-बाबांनी त्याला चांगला लॅपटॉप देऊ केला आणि त्यासोबतच जवळच्या लायब्ररीची वर्षभराची वर्गणी भरून त्याच सदस्यत्वही दिलं आणि योगायोग म्हणजे त्या लायब्ररीचे लायब्ररी असणारे दिघे काका हे सुद्धा खगोलशास्त्रात रुची असणारे होते त्यांचेही खगोलशास्त्रात खूप वाचन होते ह्या गोष्टीचा सुद्धा अर्णवला खूप फायदा झाला. एवढ्या लहान वयात अर्णवला असणारी खगोलशास्त्राची माहिती पाहून दिघे काका कधी कधी आश्चर्यचकित व्हायचे आणि त्यांच्याकडूनच त्याला इस्रो बद्दल माहिती मिळाली. इसरो म्हणजे (Indian Space And Research Organisation) ही माहिती मिळताच अर्णवचं पुढील ध्येय निश्चित झालं. चष्म्यातून मिळालेल्या माहितीचा योग्य ठिकाणी वापर करायचा असेल तर ISRO सोबत काम करणे जरुरी होते. त्याने आत्तापर्यंत कॉलेजचे 12वी पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केले होते. पदवी घेण्यासाठी तो तिरुअनंतपूरमला गेला आणि Indian Institute of Space, Science and Technology (IIST) मध्ये त्याने आपलं पदवीच शिक्षण पूर्ण केला. घरापासून लांब आल्यावर शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या अपार कष्टाची त्याला जाणीव झाली पण तो अजिबात डगमगला नाही अपार मेहनत करून त्याने मास्टर्स पूर्ण केले आणि आई बाबांकडे पुढे PhD करायची इच्छाही व्यक्त केली आई बाबानी होकार देताच तो परत अभ्यासाला लागला आत्तापर्यंत त्याने अवकाशातील बऱ्याच गोष्टी अभ्यासल्या होत्या आणि एक दिवस रात्री आकाश न्याहाळत असताना त्याची नजर JUPITER या ग्रहावर खिळली आपल्या आकाशमालेतील त्या सगळ्यात मोठ्या ग्रहांविषयी त्याला प्रचंड उत्सुकता वाटू लागली आणि हाच विषय त्याने PhD च्या अभ्यासासाठी निवडला. सोबतच त्याने ISRO मधील young scientists programme join केला. दिवसातील 18 तासही त्याला अभ्यासाला पुरे पडत नव्हते. झोपताना relaxation साठी तो त्याचा आवडता गायक असणाऱ्या अर्जित सिंगची गाणी ऐकत असे.

ISRO मधील कोर्सच्या निम्मिताने त्याला तेथील कामाची ओळख झाली. त्याची अभ्यासातील चिकाटी आणि प्रगती पाहून कॉलेजने त्याला PhD साठी scholarship देऊ केली. ISRO मधील senior scientist, research scientist यांच कामाबद्दलच dedication आणि आपल्या देशाबद्दल वाटणार प्रेम पाहून अर्णव अजूनच भारावून गेला, त्याचा कामाची आणि हुशारीची दखल घेत अर्णवसोबत अजून चार जणांना ISRO मध्ये junior assistant म्हणून join व्हायची ऑफर देण्यात आली त्यापैकी दोघांनी परदेशात नोकरी पत्करली पण अर्णव आणि इतर 3 मुले आनंदाने ISRO ला join झाली. आई बाबांकडून अर्णवच्या याही निर्णयाचे स्वागतच झाले. या कामादरम्यान त्याला त्याचा जादूच्या चष्म्यातून केलेल्या बऱ्याच निरीक्षणांचा उपयोग झाला पण माझ्याकडे जादूचा चष्मा आहे ह्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही हेही त्याला माहित होते. अर्णवला असलेली प्रचंड माहिती आणि त्याचा मनमिळावू स्वभाव याजोरावर तो seniors चा लाडका बनला आणि त्याला junior scientist म्हणून जबाबदारी देण्यात आली आवडीच्या क्षेत्रात दिग्गज माणसांसोबत काम करणं अर्णवलासुद्धा फार आवडत होत ह्याच दरम्यान त्याने चंद्रयान 1, 2, 3 सारख्या महत्वाच्या मोहिमांमध्ये आपली कामगिरी बजावली. यादरम्यान मोहीम कशा आखल्या जातात, त्यातून मिळणारी निरीक्षण कशी नोंदवली जातात, त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा ताळमेळ कसा बांधला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपयशाने खचून न जाता ते सुद्धा पचवता आलं पाहिजे अशा अनेक गोष्टी अर्णव शिकत होता. आपले कष्ट प्रामाणिक असतील तर अपयशातही देश आपल्या पाठीशी उभा राहतो, लोक आपल्याला समजून घेतात हि महत्वाची गोष्ट तो चंद्रयान 2 मोहिमेनंतर शिकला.

यासगळ्या गोष्टी सुरू असताना त्याची jupiter ह्या ग्रहाची ओढ त्याला शांत राहू देत नव्हती वेळ मिळेल तेव्हा त्याने आपला अभ्यास सुरूच ठेवला आणि ज्युपिटर च्या पृष्ठभागावर निळी केशरी रंगाची माती असल्याचे त्याला समजले त्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी तेथे गेलं पाहिजे हा विचार त्याला भेडसावू लागला आणि आपल्या आत्तापर्यंच्या अभ्यासाचा अहवाल तयार करून त्याने ISRO चे facility हेड दर. K. L. Ramchandran यांची cabin गाठली, त्यांनी अर्णवच्या मेहनतीची प्रशंक्षा केली त्याच्या कामावर विश्वास दाखवला आणि तेथे मोठ्या प्रमाणात खनिजे असू शकतात अशी शंका व्यक्त केली.

पण त्यासोबतच या मोहिमेची आखणी करणे शक्य नाही कारण refilling शिवाय ज्युपिटर पर्यंतचे अंतर पार करता येईल असे रॉकेट आपल्याकडे उपलब्ध नाही अशी अडचण असल्याचे सांगितले. तरी ह्याबाबतीत तू अभ्यास कर आणि कमीत कमी किती इंधनात आपण हे अंतर पार करू शकू ? अशी माहिती काढण्याची कामगिरी त्यांनी अर्णव वर सोपवली. अर्णव अधिक जोमाने कामाला लागला आणि अनेक गोष्टी पडताळून अनेक गणिते मांडून आपण 5000 किलो liquid nitrogen च्या मदतीने ही मोहीम करू शकतो असं निष्कर्ष काढत साधारण 3 महिन्याच्या प्रयत्नानंतर डॉ नारायणन याना परत भेटला, सरांनीही सकारात्मकता दाखवली. पुढे अनेक दिवस गेले आणि चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक यशानंतर पुढील 4 महिन्यात डॉ नारायणन यांनी अर्णवला बोलावणे पाठवले. Jupiter च्या मोहिमेला परवानगी देऊन अर्णवची नेमणूक या मोहिमेवर senior scientist म्हणून नेमणूक केली आलेल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेवून तो आपली कामे जास्त काळजीपूर्वक करू लागला. या मोहिमेसाठी अर्णवच्या मागणीप्रमाणे अजून चार जणांची टीम काम करू लागली त्यापैकी दोघेजण हे astronauts  होते जे या मोहिमेतील यानासोबत अवकाशात झेपावणार होते. अशा youngster ची मोहीम म्हणून डॉ नारायणन यांनी या मोहिमेचे नामकरण star strikers असे केले.

Star strickers चे सगळेच scientist खूप मेहनत घेऊन दिवस रात्र काम करू लागले. कामामध्ये येणाऱ्या असचानी अर्णवसोबत share करू लागले, अर्णवसुद्धा अभ्यासाच्या मदतीने आणि जादूच्या चष्म्याच्या मदतीने त्या प्रॉब्लेम्सचे बेस्ट असे solution त्यांना देऊ लागला, असच सलग अकरा महिने झपाटून काम केल्यानंतर star strickers या मोहिमेची ब्लू प्रिंट डॉ नारायणन यांच्या समोर सादर करण्यात आली.

आवश्यक त्या सुधारणा सुचवून, त्रुटी दूर करून डॉ नारायणन यांच्या सोबत 3 वरिष्ठांच्या समितीने हे प्रोजेक्ट मंजूर केलं. Star strickers च्या team ला प्रचंड आनंद झाला. आपल्यासोबत 2 astronauts नेणारी हि अनोखी मोहीम आखण्यात आल्याची माहिती सर्व ISRO मध्ये पसरली. सगळ्या टीम्स कडून Star Strickers च्या टीमला शुभेच्छा देण्यात आल्या. आता सगळे टीम members तहान भूक विसरून कामाला लागले. अर्णवने केलेल्या मांडणीपेक्षा 1000 किलो नैट्रोजन अधिक नेऊ शकणारे रॉकेट तयार करण्यात आले. रॉकेटची चाचणीसुद्धा यशस्वीरीत्या पार पडली. आवश्यक त्या तांत्रिक बाबी पार पाडून star strickers ची final take off ची तारीख ठरली.

हे रॉकेट 1 जानेवारीला सकाळी 10.30 वाजता आंध्रप्रदेशच्या सतीश धवन केंद्रातून गगनभरारी घेणार होते.  Star strickers ची टीम अत्यंत आत्मविश्वासाने एक एक टप्पा पार करत होती. 7 जानेवारीच्या सकाळी सर्व टीम आंध्रप्रदेश येथे दाखल झाली. एक अनामिक भिती पण आत्तापर्यंत केलेल्या कामाबद्दल प्रचंड आत्मविश्वास अशा संमिश्र भावनांमध्ये अर्णवची टीम तयारीमध्ये गुंतून गेली. astronauts च training झालं आणि हा हा म्हणता 9 जानेवारीचा दिवस उजाडला. T+1 min ला सर्व लौंचिंग preparations पूर्ण झाल्या, T+10 min atronauts रॉकेटमध्ये बसले आणि count down सुरू झाल, T-10, T-9, T-8, T-7, T-6, T-5, T-4, T-3, T-2, T-1 आणि star strickers च रॉकेट अवकाशात झेपावले. Star strickers च यशस्वी launching झाल्याची जणू आकाशवाणीचा झाली. त्यानंतर पुढील चार दिवसानंतर रॉकेटने पृथ्वीची कक्षा यशस्वीरीत्या पार केली, आणि 6व्या दिवशी रॉकेटसोबतचा संपर्क तुटल्याचे अर्णवला समजले voice connection परत rejoin करण्यासाठी रॉकेटची exact position माहिती होणे खूप गरजेचे होते पण रॉकेट पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर गेल्यामुळे आणि त्याच्या प्रचंड वेगामुळे त्याची position समजणे काठीण जात होते. अर्णवला थोडं टेन्शन आलं पण पुढच्याच क्षणाला त्याला आपल्या चष्म्याची आठवण झाली आणि त्याने आपल्या विश्वासातील काही लोकांना त्या चष्म्याबद्दल सांगितले. अर्णवच्या अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला कोणीच त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही पर समोर दिसणारा मार्ग पडताळून पाहणे हि वेळेची गरज होती.

 लागलीच अर्णवने बागेतून जादूचा चष्मा काढला आणि त्याचा मदतीने तब्बल 2 दिवसानंतर त्याने star strickers च रॉकेट सुरक्षित असल्याचे स्वतःच्या डोळ्यांनी पाहीले, त्याने देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानले आणि रॉकेटच्या position आणि स्पीड चा अंदाज घेऊन connection rejoin करण्याच्या सूचना आपल्या टीमला दिल्या. पण communication fail होत होत, टीम मेंबर्स कडून होणारे प्रयत्न लक्षात आल्यानंतर रॉकेटमध्ये असणाऱ्या अतिरिक्त इंधनाचा वापर करून आपण रॉकेट reboot करू शकतो अशी कल्पना astronaut च्या डोक्यात आली आणि चक्क त्यांच्या प्रयत्नांना यशही आलं. एव्हाना रॉकेट ज्युपिटर च्या कक्षेपासून काही हजार किलोमीटरच्या अंतरावर होत लागलीच रॉकेटमधील self repairing mode on झाला आणि voice connection सुद्धा rejoin झालं. पुढच्या दिवशी संधाकाळी 4 च्या दरम्याने रॉकेटने JUPITER च्या कक्षेमध्ये यशस्वीरीत्या प्रवेश केला, ही बातमी वान्यासारखी देशभरात पसरली. सर्व देश star strickers च्या टीमचे अभिनंदन करू लागला आणि पुढील मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करू लागला. जुपीटरच्या पृष्टभागावर रॉकेट मधील satelight यशस्वीरीत्या land झालं रॉकेटमधील कॅमेन्याच्या मदतीने astronant नी काही pictures पाठवली आणि पुढील काही तासात satelight चांगल्या प्रकारे काम करू लागलं. अवघ्या काही तासात भारताने सगळ्यात पहिल्यांदा jupiter च्या पृष्टभागावर उतरून भारताचा झेंडा रोवल्याची चित्र देशभरात पसरली......

भारत माता कि जय…


You may also like

Panda image
अंतराळात जाणार आम्ही - A fictional account of meeting an alien

अंतराळात जाणार आम्ही

Story by - Reva Khedkar

( VED Acting Institute )

Terms & ConditionsPrivacy Policy

Conceptualised & Developed by | Curadio media Pvt. Ltd.

success toast panda.

Yay! You have successfully subscribed to our newsletter.