Waving PandaStart listening
Back
एक दिवस संभाजी महाराज सोबत

एक दिवस संभाजी महाराज सोबत

Story by - Swanandi Kulkarni

(VED Acting Institute)

rocket image
Bulb imageBulb imageBulb imageBulb imageBulb imageBulb image

एक दिवस मी टीव्ही वरती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट बघत होते. त्या चित्रपटात महाराजांचा विश्वासघात झाला आणि ते पकडले गेले. आणि माझ्या मनात विचार आला, मी जर महाराजांना भेटले असते तर असे झाले नसते. त्यांना विश्वासघात करणाऱ्या लोकांची नावे सांगितली असती.

आणि काय अचानक मी महाराजांच्या रायगड किल्ल्यांच्या सभागृहात पोहोचले. समोर संभाजी महाराज. माझे आगमन झालेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.

महाराजांनी विचारले ‘कोण आहेस तू?’ मी नम्रपणे उत्तर दिले ‘माझे नाव स्वानंदी आहे. मी भविष्यातून आली आहे आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे.’

ते शांतपणे म्हणाले, ’बोल.‘ मी त्यांना सांगितले, ’महाराज तुम्ही पराक्रमाचे प्रतिक आहात. पण एक गोष्ट आहे - जी भविष्यात दुःखदायक ठरेल, तुमच्या आसपास विश्वासघात करणारे आहेत, खास करून तुमच्या घरातील. जर शक्य असेल तर कृपया आपल्या गुप्तहेर व्यवस्था अधिक बळकट करा. तुम्हाला कैद केले जाणार आहे. तुमच्या मृत्यूने इतिहासात फार मोठे नुकसान होईल.’

त्यांनी मला विचारले,’ जर मी हे टाळू शकलो तर मराठांचे भविष्य उज्वल होईल का? ’ मी म्हणाले,’ होय महाराज तुमचं नेतृत्व असलं तर मराठा साम्राज्य आणखी मजबूत झालं असतं.’

महाराज उठले त्यांनी तलवार उचलली आणि म्हणाले, ‘असेल तसेच मी काहीतरी बदल करेन’.

तेव्हा प्रकाश पुन्हा चमकला आणि मी माझ्या काळात परत आले. पण त्या एका भेटीने इतिहासात बदल घडवला होता. संभाजी महाराज मुगलांच्या कैदीत सापडत नाहीत आणि मराठा साम्राज्य आणखी मजबूत झालं.

तात्पर्य- एका दूरदृष्टी असलेल्या सल्ल्याने इतिहास ही बदलतो.


You may also like

Panda image
जादूचा चष्मा - Short story on a magical pair of glasses.

जादूचा चष्मा

Story by - Ishmita Joshi

( VED Acting Institute )

Terms & ConditionsPrivacy Policy

Conceptualised & Developed by | Curadio media Pvt. Ltd.

success toast panda.

Yay! You have successfully subscribed to our newsletter.