Story by - Ishmita Joshi
(VED Acting Institute)
एका गावात विनू नावाचा एक मुलगा होता. तो खूप गरीब होता. त्याचे बाबा सुतारकाम करून त्याचा शाळेचा आणिपोटापाण्याचा खर्चभागवत असतं. विनू गरीब असला तरी शाळेत मात्र हुशार होता. शाळेत विज्ञान, भूगोल आणिगणित हे त्याचे आवडते विषय होते. त्याला निसर्गाची आणितो स्वच्छ ठेवण्याची खूप आवड होती. म्हणून त्याने एक तळे तयार केले होते आणित्याभोवती आंबा, संत्र अशी फळांची झाडे आणिगुलाब, मोगरा अशी फुलझाडे लावली होती. ही विनूची सगळ्यात आवडती जागा होती. तिथे त्याचे सहा मित्र होते - जिमी-निमी नावाचे दोन छोटे मासे, हॅरी-जेरी नावाचे दोन ससे आणिडोरा-नोरा नावाचे दोन छोटे पक्षी.
विनू अडचणीत असलेल्या सर्वांना मदत करायचा. त्याचा स्वभाव अतिशय नम्र आणिप्रेमळ होता.
त्याला अंतराळ बघायची खूप आवड होती. त्याला अंतराळातील तारे, ग्रह जवळून बघायचे होते. म्हणून तो एके दिवशी एका दुकानात दुर्बीण आणायला गेला. विनू दुकानदार काकांना म्हणाला, "काका, ह्या दुर्बिणीची किंमत काय आहे?". दुकानदाराने किंमत शंभर रुपये असल्याचे सांगितले. पण विनूकडे फक्त वीसच रूपये आहेत हे पाहून त्याचे सगळे मित्र त्याला हसले. विनू बिचारा तळ्याकाठी निघून गेला.
तो तळ्याकाठी उदास होऊन बसला होता. एवढ्यात जिमी मासा वर आला आणिम्हणाला, " काय झाले विनू? का रे असा उदास झालास?" विनूने त्याला सगळी हकीकत सांगितली. निमी म्हणाला," अरे एवढंच ना? असा उदास होऊ नकोस. हो, आणितुला अंतराळ पहायचे आहे ना, तुझ्यासाठी काहीतरी गंमत आहे आमच्याकडे. थांब हं इकडे." जिमी म्हणाला आणिपाण्याखाली गेला. आणिएक लख्ख चमकणारी गोष्ट बाहेर घेऊन आला. " हा घे जादूचा चष्मा. हा चष्मा घातल्यावर एक गंमत होते. पण हा चष्मा फक्त तू लावलास तरच त्याची जादू होईल. विनू खूप खूष झाला. तो म्हणाला," तुमचे खूप खूप आभार मित्रांनो!". तो आनंदाने घरी गेला आणिरात्री तो चष्मा लावून पाहिला तर काय आश्चर्य! तो अंतराळातील तारे आणिग्रह अगदी जवळून पाहू शकत होता. तो धावत घरी गेला, आणिआईला म्हणाला, "आई हा बघ जादूचा चष्मा, ह्या चष्म्यातून सगळे अंतराळात गेल्यावर जसं दिसेल ना तसंच दिसतं. सगळे तारे ग्रह जवळून बघू शकतो आहे मी आई!" "अरे वा विनू! पण हा चष्मा दिला कोणी तुला?" आई म्हणाली. "मला हा चष्मा जिमी-निमी आणिबाकी मित्र-मैत्रिणीनीं दिला." विनू म्हणाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो चष्मा विनूने त्याच्या शाळेतल्या मित्रांना दाखवला. सगळे मित्र म्हणू लागले, "अरे विनू कोठे मिळाला तुला हा? कुणी दिला? कोणत्या दुकानातून आणलास?" "हा चष्मा मला माझ्या प्राणी मित्रांनी दिला." विनू त्याच्या प्राणी मित्रांच्या अभिमानाने म्हणाला. "ए आम्हाला घेऊन चल ना तुझ्या त्या मित्रांकडे." विनूच्या सगळ्या मित्रांनी त्याच्याकडे हट्ट धरला होता. मग शेवटी विनूच्या आवडत्या जागी म्हणजेच त्याच्या त्या तयार केलेल्या बागेत सगळ्यांना घेऊन गेला. मग त्यांनी त्याच्या सगळ्या प्राणी मित्रांना बोलावलं. विनूचे प्राणी मित्र आल्या आल्या विनूचे सगळे मित्र म्हणू लागले, "आम्हाला पण हवाय तो जादूचा चष्मा. तुम्ही फक्त विनूलाच दिला. तुम्ही किती स्वार्थीआहात, आम्हाला पण पटकन द्या आता विनूचा चष्मा वापरायला." "तुम्ही आमच्या सगळ्यांशी आणिमुख्य म्हणजे विनूशी नीट बोललात तरच आम्ही तुम्हाला जादूचा चष्मा देऊ. विनू आमच्याशी नीट बोलतो आमची काळजी घेतो म्हणून आम्ही त्याला तो चष्मा दिलाय नाहीतर अशा तुमच्यासारख्या वाईट वागणाऱ्या मुलांना आम्ही नाही देणार चष्मा. जिम्मी आणिइतर प्राणी मंडळी म्हणाली. विनूच्या शाळेतल्या सगळ्या मित्रांना स्वतःची चूक उमजली होती. ते विनूला म्हणाले, "सॉरी आम्ही तुला खूप त्रास दिला. तुझ्याशी अजिबात नीट नाही वागलो आणित्या दिवशी दुकानात तुला खूप हसलो. सॉरी!" "ते सॉरी म्हणतायेत तर आपण देऊया त्यांना एकदा माझा चष्मा वापरायला तुम्हीच तयार केलाय तो. तुम्ही म्हणाला होतात की याची जादू हा चष्मा मी घातला तरच होते पण तुम्ही एकदा त्याची अट बदला ना यांना पण तो चष्मा एकदाच वापरून बघू दे ना प्लीज माझ्या प्राणी मित्रांनो!" विनू म्हणाला." ठीक आहे विनू. विनू म्हणतोय म्हणून देतोय हा आम्ही तुम्हाला तर चष्मा वापरायला नाहीतर नसता दिला." जिमी निमी, डोरा-नोरा, हॅरी जेरी, या सगळ्यांनी त्याच्यावरती एक सीक्रेट मॅजिक मंत्र म्हटला आणिचष्म्याची जादू थोडीशी बदलली.
जसा जसा एक एक मित्र चष्मा लावून पहात होता तसा तसा त्यांना अंतराळातला एक एक ग्रह, एक एक तारा जवळून दिसत होता. सगळ्यांना खूप आनंद झाला.
विनूचे बाकी शाळकरी मित्र त्यांच्या त्यांच्या घरी जायला निघाले तेव्हा ते विनूला म्हणू लागले, "सॉरी यार विनू! आम्ही तुला शाळेत पण खूप त्रास देतो, तुझी अजिबात मदत करत नाही पण तरीसुद्धा तु आम्हाला चष्म्याची जादू बघायला दिलीस." " इट्स ओके मित्रांनो! पण इथून पुढे मलाच असं नाही पण बाकी कोणालाच त्रास देऊ नका, सगळ्यांची मदत करा."
Yay! You have successfully subscribed to our newsletter.